महिलांवरील अत्याचारांत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचा दावा राज्य सरकारकडून सातत्याने केला जात असतानाच, महिलांवरील अत्याचारांच्या नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचाराचे तब्बल ७० हजार ५१५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. […]
