अर्थसंकल्पानंतर अवघ्या तीन महिन्यांत ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या; राज्याच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह?
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने तब्बल ₹97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्याने राज्याच्या आर्थिक नियोजनावर आणि वित्तीय व्यवस्थापनावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अर्थसंकल्प सादर होऊन अवघे तीन महिने उलटत असताना इतक्या मोठ्या अतिरिक्त निधीची गरज भासल्याने विरोधकांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वित्त विभागाच्या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनानुसार, या पुरवणी मागण्या […]
