MSRTC buses parked at Mahad depot highlighting shortage of drivers and conductors affecting services महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एसटी आगारात ८७ पदे रिक्त; चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे फेऱ्या रद्द, प्रवासी त्रस्त

महाड: महाड एस.टी. आगारात चालक-वाहकांच्या तीव्र कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून ओळख असलेल्या महाडकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील महाड हे महत्त्वाचे केंद्र असून, रायगड किल्ल्यासह परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. […]