धरणांपासून उद्योगांपर्यंत… भारताच्या आधुनिकतेचा शिल्पकार…!
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या : अभियंता, प्रशासक, उद्योगद्रष्टा आणि आधुनिक भारताच्या उभारणीतील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आज १५ सप्टेंबर…! देशभरात आजचा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. पण हा केवळ अभियंत्यांना शुभेच्छा देण्याचा दिवस नाही…; तर पाणी, सिंचन, धरणे, उद्योग, शिक्षण आणि आधुनिक विकासाचा विचार प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये उतरवणाऱ्या एका असामान्य राष्ट्रनिर्मात्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. १५ सप्टेंबर १८६१… कर्नाटकातील मुद्देनहळ्ळी […]
