महाडमध्ये श्वास घ्यायलाही त्रास… कचऱ्याने गाव गुदमरलं!
महाड : महाड नगरपरिषदेच्या लाडवली येथील कचरा डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिक त्रस्त झाल्याने अखेर ग्रामस्थांनी नगरपरिषदेवर धडक देत नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याकडे थेट जाब विचारला. येत्या आठ दिवसांत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. महाड शहरातून दररोज गोळा होणारा मोठ्या प्रमाणातील कचरा सुमारे सहा किलोमीटर अंतरावरील लाडवली येथील डम्पिंग ग्राउंडवर […]
