PM-Kisan व घरकुल योजनेची संकेतस्थळे ठप्प; महाडमध्ये लाभार्थी त्रस्त, नोंदणी प्रक्रिया बंद
महाड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेची संकेतस्थळे दीर्घकाळापासून ठप्प असल्यामुळे महाड तालुक्यातील शेतकरी आणि लाभार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत. संकेतस्थळ बंद असल्याने नवीन नोंदणी पूर्णपणे ठप्प झाली असून, शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत लघु शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत तीन हप्त्यांत […]
