नरेंद्र महाडीक राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे स्वागताध्यक्ष; पंढरपूरात २२–२४ मे दरम्यान आयोजन
महाड: महाड येथील होप फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र महाडीक यांची पाचव्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे. हे संमेलन २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘माझी शाळा माझा फळा’ या समूहाच्या वतीने आयोजित या संमेलनात स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे राज्यभरातील सुलेखनकार, फलक लेखनकार, रांगोळीकार आणि चित्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या निवडीबद्दल […]
