LPG दरवाढीवरून अंधेरीत काँग्रेसचा इशारा; १४ मार्चला आंदोलन
मुंबई : एलपीजी गॅसच्या दरवाढी आणि कथित गॅस तुटवड्याच्या विरोधात अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील उत्तर-पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर ‘आकाश स्वीट्स’ समोर हे धरना आंदोलन होणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला असून […]
