महाड डेव्हलपमेंट प्लॅनमधील अर्धवट रस्ते ‘दारूपार्ट्यांचे अड्डे’; नगरपरिषद व पोलिसांचे दुर्लक्ष उघड
महाड – महाड नगरपरिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅनअंतर्गत मंजूर झालेल्या अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत अडकली आहेत. काही रस्त्यांचा निकृष्ट दर्जाही उघड झाला आहे, ज्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे हे अर्धवट, अंधारात बुडलेले रस्ते आता रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचे उघडे ‘अड्डे’ बनले आहेत. मद्यपींच्या रंगेल पार्ट्या, दारूच्या बाटल्या, सिगारेटचे थुटके आणि गुटख्याच्या […]
