Devendra Fadnavis speaking in Maharashtra Legislative Assembly on Ajit Pawar accident investigation and law enforcement response महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजित पवार अपघातप्रकरणी सखोल चौकशी; घातपात असल्यास दोषींना सोडणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस  

मुंबई : अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी कोणत्याही प्रकारचा घातपात झाला असल्यास दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावर भावनिक आणि ठाम भूमिका मांडली.“अजितदादा पवार हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. गेल्या काही वर्षांत आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते,” असे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: सरकारने जनाची नाही, तर किमान मनाची तरी ठेवावी: विजय वडेट्टीवार 

घरकुल योजनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारला फटकारले मुंबई : राज्यात घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना निधी न मिळाल्याने गरिबांची मोठी अडचण झाली आहे. या गंभीर मुद्द्यावर बुधवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. “तीन पावसाळे झाले. लोक कुठे राहत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Ajit Pawar: महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणजे अजितदादाच; मुख्यमंत्र्यांच्या भावनिक भाषणाने विधानसभा गहिवरली

मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. ‘वंदे मातरम्’ने कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात काही काळ भावनिक शांतता पसरली होती. सभागृहाचे नेते म्हणून बोलताना Devendra Fadnavis यांनी Ajit Pawar यांच्यासोबतच्या आठवणी मनापासून मांडल्या. त्यांच्या या भाषणाने सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील अनेक सदस्य भावूक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : स्मार्ट मीटरमुळे 99% ग्राहकांचे वीजबिल वाढलेले नाही — मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर : राज्यात राबविण्यात येत असलेली वीज स्मार्ट मीटर योजना उपयुक्त ठरली असून, हे मीटर बसविण्यात आलेल्या 99 टक्के ग्राहकांचे वीजबिल वाढलेले नाही, असे अहवाल उपलब्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात दिली. या योजनेंतर्गत ग्राहकांना प्रत्येक तासाचा वीज वापराचा तपशील (रिपोर्ट) उपलब्ध होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धान उत्पादकांना न्याय हवा; चंद्रपूरला कृषी विद्यापीठाची मागणी — मुनगंटीवारांचे विधानसभेत सरकारला खडे बोल

नागपूर – “आपण पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य होतो… त्यामुळे शेतकऱ्यांप्रती भावना तीव्र आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,” अशी ठाम मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर करताना केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. “चार दिवस विदर्भाचे मीठ खाल्ले… त्या मिठाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session – मागाठाणेतील शुक्ला कंपाऊंड पाडकामावर विधानसभेत संतापाचा स्फोट

बाऊन्सर्ससोबत अमानुष पाडकाम?—अतिरिक्त मुख्य सचिवांकडून ६० दिवसांत चौकशी नागपूर – मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांचे विकासक–मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि बाऊन्सर्सच्या उपस्थितीत अमानुष पाडकाम झाल्याचा धक्कादायक आरोप आज विधानसभेच्या विशेष बैठकीत करण्यात आला. सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनीही या कारवाईवर रोष व्यक्त करत मंत्र्यांना कठोर शब्दांत धारेवर […]

मुंबई ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबई मनपा शाळांचे खासगीकरण: विधानसभेत प्रश्नोत्तर तासात मोठा गदारोळ

उत्तरांवर सदस्यांचे समाधान नाही; अध्यक्ष नार्वेकर यांचे स्पष्ट निर्देश नागपूर – मुंबई महानगरपालिका शाळांचे खासगीकरण या संवेदनशील मुद्द्यावर आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात जोरदार चर्चा झाली. राज्य मंत्री, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि ज्येष्ठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उत्तरांनी सदस्य समाधानी नसल्याने सभागृहात क्षणोक्षणी तणाव वाढला. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना स्पष्ट निर्देश देत म्हटले—“उत्तर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Winter Session : तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक मंजूर; ६० लाख कुटुंबांना दिलासा, सातबारावर आता स्वतंत्र नाव

नागपूर – राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये लहान भूखंडांवर घरे बांधून राहणाऱ्या सुमारे ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा देणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५’ आज विधानसभेत मंजूर झाले. तुकडेबंदीतील जाचक अटी शिथिल केल्याने आता लहान भूखंडांची खरेदी-विक्री सुलभ होणार असून, संबंधित मालकांचे स्वतंत्र नाव सातबारा उताऱ्यावर लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विधेयक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात मांडले. अनेक वर्षांपासून ५-१० गुंठे किंवा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात डिजिटल–फोरेन्सिक पुरावे; ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणार : CM फडणवीस

नागपूर – सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डिजिटल तसेच फोरेन्सिक दोन्ही पातळ्यांवर ठोस पुरावे मिळाले असून, आरोपींनी तिची फसवणूक केल्याचे चौकशीत स्पष्ट दिसत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्य सरकार पुढील ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. भाजप सदस्य अमित साटम यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. उपप्रश्नांमध्ये विजय वडेट्टीवार, नाना पटोले, सुनील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Winter Session : मुंबई CSMT प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार; विधानसभेत CM फडणवीसांची घोषणा

नागपूर – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानक प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ही घोषणा होताच सभागृहात सदस्यांनी बाके वाजवून जोरदार स्वागत केले आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” असा जयघोष केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मागील अधिवेशनात CSMT परिसरात […]