वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील परराज्यातील विद्यार्थ्यांची ‘घुसखोरी’; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्यायाचा ठपका
मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत परराज्यातील विद्यार्थ्यांची घुसखोरी थांबण्याचे नाव घेत नाही. महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे दाखवून अनेक विद्यार्थ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील शेकडो पात्र विद्यार्थ्यांचे एमबीबीएस शिक्षणाचे स्वप्न धुळीस मिळाल्याचा आरोप होत आहे. अंदाजे १५० हून अधिक परराज्यातील विद्यार्थ्यांनी राज्य सामायिक […]

