महाराष्ट्र

ट्रिपल नव्हे तर ट्रबल इंजिन सरकार : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

X: @NalavadeAnant नागपूर: विधानसभेत राज्यातील शेतकऱ्यांचा मुद्दा आज प्रचंड गाजला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. जयंत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आणि मोठ्या इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हा गेल्या तीन चार महिन्यांपासूनचा राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू आहे. सरकारला आणखी एक इंजिन जोडल्याने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसचा सोमवारी नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा

X: @therajkaran नागपूर: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विरोधकांच्या अनुपस्थितीत वादग्रस्त ऑनलाईन कॅसिनो विधेयकाला विधानसभेची मंजुरी

X : @NalavadeAnant नागपूर: विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही. विरोधी पक्षाने सभात्याग केल्यावर विरोधी पक्ष नेत्यांच्या अनुपस्थितीत विधेयके घाईगडबडीत मंजूर करून घेतल्याने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी येथे तीव्र नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांच्या कार्यपद्धतीवर ही नाराजी व्यक्त करण्यात आली. विरोधकांनी सभात्याग (walk out by opposition in […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

X: @NalavadeAnant नागपूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या; विधानसभेत विरोधी पक्षाची मागणी

X: @therajkaran नागपूर: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधान सभेत आज राज्यातील अवकाळी  पाऊस, दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांची दुरावस्था हा विषय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर बोलताना उपस्थित केला. शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, संपूर्ण कर्जमाफी करा, (LoP Vijay Wadettiwar demands complete loan waiver for farmers) अशी मागणी आक्रमकपणे केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशद्रोहयाच्या मांडीला मांडी लावून बसले; अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

X: @therajkaran नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा सदस्य माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसण्याच्या घटनेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झडली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी हा विषय उपस्थित केला. सत्ताधारी सदस्यांनीच मलिक यांच्या विरोधात पूर्वी केलेल्या वक्तव्यांचे स्मरण करून दिले. यावर गृहमंत्री […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अबब ! ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

X: @therajkaran नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या स्थूल पुरवणी मागण्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४८ हजार ३८४.६६ कोटी इतका आहे. यापैकी १९ हजार २४४.३४ कोटी रुपयांच्या च्या मागण्या अनिवार्य खर्च, ३२ हजार ७९२.८१ कोटींच्या विविध कार्यक्रमांतर्गत, तर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता शरद पवार गटाचे कार्यालयही बंडखोर गटाच्या ताब्यात

X: @NalavadeAnant नागपूर: नागपूर येथे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्भूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला येथील विधिमंडळातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी बहाल केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चार महिन्यांपूर्वी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून तब्बल ४३ आमदारांचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फुटून (Split in NCP) सत्ताधारी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी आक्रोश मोर्चा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा  Twitter : @NalavadeAnant मुंबई खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP of Sharad Pawar faction) शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे. दुष्काळ (drought), नापिकी, अवकाळी पाऊस (unseasoned rain) आणि चुकीच्या सरकारी धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

यालाच रामराज्य म्हणायचे काय? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई नागपूर येथील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या (murder of Dalit youth) होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. ‘ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी असून यालाच रामराज्य म्हणायचे काय? असा संतप्त सवाल करत सरकारला सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]