विमा क्लेम अडचणी व अवाजवी हॉस्पिटल बिलांवर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारची हालचाल; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई: रुग्णांना उपचारावेळी विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच काही रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी वैद्यकीय बिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रथमच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI), खाजगी विमा कंपन्या, खाजगी रुग्णालयांचे प्रतिनिधी […]
