Divyang: मुंबई मेट्रो-3 मध्ये दिव्यांगांना २५% सवलत; २३ नोव्हेंबरपासून अमलबजावणी; वरिष्ठ पत्रकार दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने दिव्यांग प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मेट्रो-3 मार्गिकेवर दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणारी २५ टक्के सवलत रविवार, २३ नोव्हेंबरपासून अधिकृतपणे लागू होत आहे. सवलतीची घोषणा होऊन दीड महिना उलटूनही ती प्रत्यक्षात सुरू न झाल्याने दिव्यांग प्रवाशांमध्ये वाढत चाललेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. एमएमआरसीच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या […]
