महाराष्ट्राची देशात पहिली बाजी!
केंद्राकडून ₹५५८ कोटींच्या कृषी निधीला हिरवा कंदील; पण शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष लाभ किती आणि केव्हा? मुंबई : महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्याचा ₹३३५ कोटींचा निधी मंजूर केला असून, राज्य शासनाच्या ₹२२३ कोटींच्या सहभागासह आता एकूण ₹५५८ कोटींचा निधी कृषी विकासासाठी उपलब्ध होणार आहे. या मंजुरीमुळे उपलब्ध निधीच्या प्रभावी वापराच्या निकषावर महाराष्ट्राने देशात आघाडी घेतल्याचे मानले जात […]
