N D Studio : एन.डी. स्टुडिओमध्ये २५ डिसेंबरपासून कार्निवल; कलाकारांची विशेष उपस्थिती
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कर्जत–खालापूर येथील एन.डी. स्टुडिओमध्ये भव्य कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्निवल दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत खुले राहणार असून, खेळ, मनोरंजन आणि लोकप्रिय कलाकारांसोबत संवाद अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना अनुभवता येणार आहे. या कार्निवलमुळे वर्षाअखेरीस कौटुंबिक पर्यटनाचा आनंद लुटण्याची अनोखी संधी मिळणार असून, […]

