Minister of State Madhuri Misal speaking in Maharashtra Assembly on Jogeshwari SRA project issue महाराष्ट्र ताज्या बातम्या

जोगेश्वरी SRA प्रकल्पात अनियमिततेचा आरोप; चौकशी करून कारवाई होईल – माधुरी मिसाळ

मुंबई – : जोगेश्वरी (पूर्व) येथील सीटीएस क्रमांक ४५ आणि ४८ असलेल्या जमिनीवरील विकासकामासाठी बिल्डर ग्यानप्रकाश शुक्ला एलएलपी यांनी परवानगी मिळविताना अनियमितता केली असेल तर त्याची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले. आमदार प्रकाश सुर्वे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. एसआरएच्या नकाशात ९ मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ ६ मीटरचा रस्ता असताना अग्निशमन […]