‘भारत टॅक्सी’चा महाराष्ट्रात शुभारंभ; सहकार मॉडेलमधून ३ ते ४ हजार रोजगारांचा सरकारचा दावा
चालक भागधारक असलेले सहकारी मॉडेल; सर्ज प्रायसिंग नसल्याचा दावा मुंबई : राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा महाराष्ट्रात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली आणि गुजरातनंतर महाराष्ट्र हा या उपक्रमाची अंमलबजावणी करणारा तिसरा राज्य ठरला […]
