रायगडावरील प्रस्तावित नव्या रोपवेसाठी पाचाडचा पर्याय; जिजामाता समाधीपासून मार्ग सुरू करण्याची मागणी
पाचाड ग्रामस्थ व शिवप्रेमींचे भरत गोगावले यांना निवेदन; ज्येष्ठ, महिला, दिव्यांग आणि पर्यटकांना सुविधा मिळण्याचा दावा महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी भविष्यात नवीन रोपवे उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन झाल्यास तो पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधी परिसरातून सुरू करावा, अशी मागणी पाचाड परिसरातील ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी केली आहे. या मागणीचे निवेदन स्थानिक आमदार तथा […]
