आजारी वडिलांच्या कायदेशीर पालकपदी मुलीची नियुक्ती; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
‘पॅरेन्स पॅट्रिए’ तत्त्वाचा अवलंब; आर्थिक व कायदेशीर निर्णय घेण्यास असमर्थ असलेल्या वडिलांच्या हिताचे प्रतिनिधित्व करण्याची मुलीला परवानगी मुंबई : गंभीर आजारामुळे स्वतःचे आर्थिक आणि कायदेशीर निर्णय घेण्यास असमर्थ असलेल्या वडिलांच्या कायदेशीर पालकपदी त्यांच्या मुलीची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या खंडपीठाने […]
