महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : “लाडक्या बहिणींना अडवले ते तुम्ही; योजना बंद करण्यासाठी कोर्टातही तुम्ही गेलात”— उपमुख्यमंत्री शिंदे  

नागपूर : हिवाळी अधिवेशनात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम राहिला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांवर हल्लाबोल करत करारी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, “योजना सुरू होताच तिला ‘फसवी घोषणा’ म्हणणारे तुम्हीच. इतकेच नाही, योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले तेही तुमचेच नेते. वडपल्लीवार कोर्टात गेले नव्हते […]

लेख

कार्तिगाई दीप वाद : द्रमुकचा हिंदू परंपरा आणि न्यायव्यवस्थेवरील निखळ हल्ला

तिरुपारंकुंद्रममधील कार्तिगाई दीपम प्रकरणाने तामिळनाडूची खरी राजकीय आणि प्रशासकीय वास्तवता उघड केली आहे. भगवान मुरुगन यांच्या शतकानुशतके चालत आलेल्या पवित्र परंपरेला रोखण्याचे काम कुणी धर्मसंस्था, कुणी स्थानिक समुदाय किंवा कुणी वक्फ बोर्डाने केले नाही; हे पवित्र विधी थांबवले ते राज्यातील सत्ताधारी द्रमुक सरकारने. मद्रास उच्च न्यायालयाने दीप पेटवण्याचा अधिकार भक्तांना परत दिल्यानंतरही द्रमुक प्रशासनाने जणू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींनी आधी मतदारयादीचा अभ्यास करावा – महसूलमंत्री बावनकुळे यांचा पलटवार

मुंबई: “राहुल गांधींचे आरोप हे निव्वळ वेडेपण आहे. त्यांनी आधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करावा. दुबार नावे असणे हा काही नवीन प्रकार नाही — ती संपूर्ण राज्यभर आहेत. कामठीत माझ्याविरुद्ध लढलेल्या काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांचेच नाव दुबार आहे, ते राहुल गांधींना दिसत नाही का?” असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकार […]