गुटखा विक्रेत्यांवरही मकोका लागू; कायदा अधिक कठोर करण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
नागपूर – राज्यात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. परंतु सध्याच्या कायद्यातील “हार्म आणि हर्ट” या दोन आवश्यक घटकांचा अभाव […]
