मुंबई–गोवा महामार्गावरील ओव्हरलोड कोळसा वाहतुकीविरोधात इशारा; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास चक्काजाम
महाड: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर सुरू असलेल्या ओव्हरलोड कोळसा वाहतुकीमुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वाहतूक सेनेने प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसांत ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद न झाल्यास चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला. या संदर्भात सुभाष मोरे यांनी पेण येथील उपप्रादेशिक […]
