महसूल खाते निवडणुकीत व्यस्त; रेती माफियांनी सावित्री नदीत दिवसाढवळ्या वाळू केली फस्त!
महाड: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीत महसूल प्रशासन पूर्णपणे व्यस्त असतानाच या संधीचा गैरफायदा घेत रेती माफियांनी सावित्री नदीच्या खाडीपात्रातून दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केल्याचे उघड झाले आहे. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील केभुर्ली परिसरात, ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल रिद्धेशजवळ सावित्री खाडीपात्रात पोकलेन मशीनच्या सहाय्याने सर्रास वाळू उपसा सुरू असून, ही वाळू थेट डंपरमध्ये भरून […]
