येत्या बुधवारी सुपरमून दर्शन!
ठाणे: येत्या बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात एक मनमोहक खगोलीय दृश्य पाहायला मिळणार आहे. या दिवशी सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्यास त्याचे बिंब नेहमीपेक्षा मोठे आणि अधिक तेजस्वी दिसते. यालाच […]
