तिहेरी तलाक मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ; मुस्लिम महिलांच्या संरक्षणासाठी सरकार ठाम : योगेश कदम
मुंबई : मुस्लिम महिलांना तिन वेळा ‘तलाक’ उच्चारून घटस्फोट देणे आणि अशा महिलांना तसेच त्यांच्या मुलांना संरक्षण देण्याच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या विषयावरील लक्षवेधी सूचनेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन काही काळ सभागृहात गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभा नियम १०५ अंतर्गत ही लक्षवेधी सूचना मांडली. नाशिकमधील दोन महिलांनी तिहेरी […]
