महाराष्ट्र ताज्या बातम्या

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल…….!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास….. मुंबई– महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक असून कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल.शिवाय कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल, असे ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबईकरांसाठी मोठी दिलासा योजना: ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना नियमितीकरणाचा मार्ग मोकळा — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – अनेक वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्याने आर्थिक, कायदेशीर आणि व्यवहारातील अडचणींना सामोरे जाणाऱ्या सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी राज्य सरकारने ‘सुधारित भोगवटा अभय योजना’ लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत ही घोषणा करताना सांगितले की या निर्णयाचा थेट दहा लाखांहून अधिक मुंबईकरांना लाभ होणार आहे. विधानसभेत निवेदन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session: मुंबईला ‘पागडीमुक्त’ करण्यासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; स्वतंत्र नियमावली येणार — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत मोठी घोषणा

नागपूर – मुंबईला पागडीमुक्त करण्यासाठी आणि पागडी इमारतींचा न्याय्य, सुयोग्य आणि जलद पुनर्विकास करण्यासाठी शासन स्वतंत्र नियमावली तयार करत असल्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. “भाडेकरू आणि घरमालक — दोघांच्याही हक्कांचे संरक्षण केले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी सांगितले, मुंबईतील सुमारे १९,०००+ सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रक्रियेला गती; २५ हजार झोपडपट्ट्यांसाठी नवे धोरण — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

नागपूर – मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचे आणि वनजागेवरील सुमारे २५ हजार झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने नवे धोरण तयार केले असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या धोरणामुळे उद्यानातील मौल्यवान वनक्षेत्र पुन्हा मोकळे होऊन संवर्धनाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन करताना सांगितले की, उद्यानातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींच्या पुनर्विकासाला गती; नियमावलीत फेरबदल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

नागपूर – मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनींवरील जुन्या, धोकादायक चाळी आणि वस्त्यांच्या पुनर्विकासाला आता झपाट्याने गती मिळणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. कापड गिरण्यांच्या जमिनीवरील बहुसंख्य चाळी अत्यंत जर्जर स्थितीत असून, रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा तातडीने पुनर्विकास आवश्यक आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शासकीय भूखंडावरील इमारतींच्या स्वयं/समूह पुनर्विकासासाठी राज्य सरकारची नवी धोरणात्मक रूपरेषा जाहीर

मुंबई: मुंबईतील व राज्यातील शासकीय भूखंडांवरील जुन्या इमारतींच्या स्वयं किंवा समूह पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने व्यापक धोरण अंतिम केले आहे. महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली. अनेक वर्षे प्रक्रियात्मक अडथळ्यांमुळे ठप्प झालेल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी हे धोरण महत्त्वाचे मानले जात आहे. पुनर्विकासासाठी मोठ्या सवलती आणि रचनात्मक बदल स्वयंपुनर्विकास करणाऱ्या संस्थांना […]