धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनासाठी समिती; तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई — धारावी कोळीवाड्याच्या बाह्य सीमांकनाच्या प्रश्नावर निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी कोंकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. समितीने तीन महिन्यांत सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात धारावी कोळीवाड्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर बैठक पार पडली. बैठकीला स्थानिक आमदार डॉ. ज्योती गायकवाड आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ […]
