ZP Elections : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य २१ जानेवारीच्या सुनावणीवर!
मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य आता २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर अवलंबून राहणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील सर्व याचिकांवर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने कोणतीही मुदतवाढ मंजूर न करता सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (SEC) ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका घेण्यासाठी […]
