ताज्या बातम्या

अनधिकृत वृक्षतोडीसाठी यापुढे ५० हजार रुपये दंड : मंत्री सुधीर मुनगंटीवार

X : @therajkaran

मुंबई – ‘अनधिकृत वृक्षतोडीसाठी यापुढे ५० हजार रुपये दंड आकारला जाईल, या संदर्भातील लेखी आदेश १५ जुलैपर्यंत घोषित केला जाईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासात केली. 

जिंतूरजवळील महामार्गासाठी चारशे वर्षे जुनी वडाची मोठी झाडे तोडण्यात आली, असा प्रश्‍न आमदार राहुल पाटील यांनी विचारला होता. मुनगंटीवार उत्तरात म्हणाले, ‘अनधिकृत वृक्षतोडीसंदर्भात १९६७ च्या कायद्याद्वारे एक हजार रुपये दंड आकारला जात असे. आज त्या १ हजार रुपयांचे मूल्य ५० पट वाढले. यापुढे अनधिकृत वृक्षतोडीला ५० हजार रुपये दंड ठोठावला जाईल. मंत्रिमंडळापुढे विषय आणून त्याचे कायद्यात रूपांतर केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते म्हणाले,  राज्य सरकारने पुढाकार घेऊन राबवलेल्या वनीकरण (forestry) मोहिमेला चांगले यश आले आहे. महाराष्ट्रात वनेतर वृक्षाच्छादित क्षेत्रात किंवा वनेतर हरित क्षेत्रात अडीच हजार चौरस किलोमीटरने वाढ झाली. सरकारी प्रयत्नांना सर्वच आमदारांनी तसेच जनतेने साथ दिल्याने हरित क्षेत्र  वाढले.

‘खासगी भूमीतील वृक्षतोडीसंदर्भात (tree cutting) एखाद्या व्यक्तीने विहित नमून्यात अनुमती मागितल्यास त्या संदर्भात विहित कालावधीत निर्णय देणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित अधिकार्‍यांवरही दंडात्मक कारवाई केली जाईल. या संदर्भातील वटहुकूम येत्या आठवड्यात काढू’, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी जाहीर केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज