लेख

गुढीपाडवा २०२६: ‘पराभव’ संवत्सराची सुरुवात, जाणून घ्या गुढी उभारण्याची योग्य वेळ

मुंबई: येत्या १९ मार्च रोजी गुढीपाडवा साजरा होत असून हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. यंदा सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९४८ या नूतन वर्षाचे नाव ‘पराभव’ संवत्सर असल्याची माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

सोमण यांच्या मते, गुरुवारी सकाळी ६.५३ नंतर गुढी उभारून गुढीपाडव्याचा सण साजरा करावा. यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सूर्योदयाच्या वेळी नसल्यामुळे तिला ‘क्षयतिथी’ मानले जाते.

फाल्गुन अमावास्या तिथी सकाळी ६.५३ वाजता संपल्यानंतर नव्या वर्षाची सुरुवात होत असून त्या वेळेनंतर गुढी उभारणे शुभ मानले जाते.

नूतन वर्षाचे नाव ‘पराभव’ संवत्सर असून त्याचा अर्थ अनीती, असत्य, दुष्टपणा, स्वार्थ आणि भ्रष्टाचाराने वागणाऱ्यांचा पराभव होणे असा घेतला जातो, असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

हिंदू पंचांगानुसार संवत्सरांची एकूण ६० नावे असून ती क्रमाने येत असतात.

यापूर्वी २८ मार्च २०१७ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदेची ‘क्षयतिथी’ आली होती. त्यावेळी अमावास्या संपल्यानंतर गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला होता. यानंतर अशी स्थिती पुन्हा १० एप्रिल २०३२ रोजी येईल, अशी माहितीही सोमण यांनी दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

1 Comment

  1. web site

    March 16, 2026

    My penis head is bleedingWife fucks husband strap onMale fuck machines videoToilet
    pissing clipsWanking girls pissingFemale condom and anal sexOld and young sex tube3d adult sex sales xnxx
    Universal gay hangoutAsian femdom empress cbtPresley maddox gangbangAdult
    entertainment in port charlotte fl floridaAnal lesbian porn starShemale on real
    sexEnema sex fetish xnxxgratis.com Jessice beil nudeNude bar las vegas15 mins free movie pass xxxVintage travel trailers for saleNon nude pre
    girl galleryBoys cocks exposed through their
    shortsReal adultery sex tapes xnxx Jerry oconnell nudeHairy latino babesBi cum bukakeSecratary blow job
    picsDecrease in husbands sex drivePictures of makeup colors for
    redheadsLucinda franks sexSexy pps downloadsCoast vintage racingMasturbation sexe gratuitTowne stripper
    parkvilleCouples teach sex to young womenBreast cancer with a heart dishclothVintage style walletsSharpova nakedAnal cancer treatment options6069 lingerieMai sheng kelsey hmong porn

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

लेख

सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

Twitter : @therajkaran लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे
लेख

मराठवाडा कात टाकणार!

Twitter : @abhaykumar_d मराठवाड्याच्या कायापालटाचा करण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सोडला आहे. ४६