मुंबई

पालकमंत्री मुंबई शहराचे पण ध्वजवंदन करणार ठाण्यात…..!

X: @therajkaran

महायुती सरकार मध्ये ध्वजवंदनावरून गोंधळ…..?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि देवेंद्र फडणवीस यांचा भाजप अशा महायुती सरकारने उद्या होणाऱ्या ध्वजवंदनावरून आणखी एक मोठा घोळ घातल्याची गंभीर व धक्कादायक घटना गुरूवारी समोर आली.

उद्या २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दीन.खरंतर १५ ougest चे ध्वजवंदन हे फार महत्त्वाचे मानले जाते. पण ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री सरकार कडून नेमले जातात तेच मंत्री त्या त्या जिल्ह्याच्या मुख्यालयात म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयांत ध्वजवंदन करतात.पण यावेळी पहिल्यांदाच महायुती सरकारने आजपर्यंत पाळले गेलेले नियम, प्रथा परंपरा, संकेत, राजशिष्टाचार सर्वच धाब्यावर बसवल्याचे ठळकपणे समोर आले. त्याला कारण आहे या सरकार मध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर चे पालकमंत्री आहेत या सरकारमधील मंत्री अनुक्रमे दिपक केसरकर व मंगलप्रभात लोढा.तरं ठाणे जिल्हा पालकमंत्री आहेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई. त्यांच्याच कडे सातारा जिल्हा पालकमंत्री पदही आहे.

सातारा जिल्हा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जन्मभूमी तरं ठाणे जिल्हा ही कर्मभूमी.त्यामूळे मुंबई शहरासकट ठाणे व सातारा जिल्ह्यावर आपला रिमोट असावा या हेतूने या तीनही जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे विश्वासू सहकारी दिपक केसरकर व शंभूराजे देसाई यांना नेमले आहे. गेल्या दीड वर्षाच्या कारकिर्दीत २६ जानेवारी व १५ ougest हे सुरळीत पार पडले. मात्र यंदा सर्व प्रोटोकॉल ला फाटा देत यंदा प्रथमच मुंबई शहर पालकमंत्री दिपक केसरकर हे उद्या २६ जानेवारीला पहिल्यांदाच ध्वजवंदन करणार असल्याने येथील राजकीय वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली आहे. खरंतरं कोणता मंत्री कुठे कधी किती वाजता झेंडावंदन करतील यासंदर्भात राज्याचा सामान्य प्रशासन विभाग अधिकृतरित्या एक परिपत्रक आदल्या दिवशी काढते हा झाला प्रोटोकॉल. पण यंदा हे सर्व बाजूला सारत ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने याची अधिकृत बातमी काढल्याने या बातमीला महत्त्व आले आहे. ते काहीही असले तरी या सरकारने विरोधकांच्या हाती एक आयते कोलीत दिल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर चर्चिली जात आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव