मुंबई

पारा यांचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी येणार अरुणभाई गुजराथी

बच्चे कंपनीही विपुल शिल्प पाहून झाले आनंदीत 

X : @Rav2Sachin

मुंबई:  सर जे. जे स्कूल ऑफ आर्टचे वरिष्ठ प्राध्यापक राजेंद्र पाटील उर्फ पारा यांचे मंगळवारपासून आठवे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. पारा यांच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन ३२ वर्षांपूर्वी  विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले होते. आता पुन्हा वयाच्या ८४ वर्षी ते जळगाव येथून पारा यांचे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी जहांगीर कलादालनाला सोमवारी भेट देणार आहेत. 

पारा यांच्या प्रदर्शनात चित्रांसह मांडण कलाकृती, टेराकोटा अशी विपुल शिल्पे बघायला मिळत आहे. प्रदर्शनाला कला प्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. बच्चे कंपनीही प्रदर्शन पाहून आनंदीत होत आहे. सोमवारी (दि २५ डिसेंबर) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. पारा यांनी आपल्या चित्र प्रदर्शनात अवजारांचे चित्र आणि शिल्पे कलाप्रेमीं समोर मांडताना या अवजाराने काम करणाऱ्या कामगारांच्या कामांचे प्रतिबिंब रेखाडलेले आहे. अवजार हे कामासाठी उपयोगी ठरते, तसेच संरक्षणासाठीही अवजारांचा उपयोग केला जातो. 

या अवजारांची उत्पती पारा यांनी आपल्या चित्र आणि शिल्पकलातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळेच त्यांचे चित्र आणि शिल्पकला पाहणारे कलाप्रेमी भारावून गेले आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. पारा यांच्या शिल्पकलेतून विद्यार्थ्यांना मानवी उत्क्रांतीतील अवजारे येथे पाहायला मिळत असल्याने त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात आहे. 

हे प्रदर्शन पाहून आनंदीत झालेल्या बच्चे कंपनीने पारा यांची स्वाक्षरीही घेतली. पारा यांना दोन वेळा बॉम्बे आर्ट सोसायटीचे राज्यपाल सुवर्णपदक मिळाले आहे. जी. डी. आर्ट या पदविकेत महाराष्ट्रात प्रथम श्रेणीतून प्रथम आल्याबद्दल राज्य शासनाचे सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांची देश- विदेशात चित्र प्रदर्शन भरविण्यात आली आहेत. 

पारा हे जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील गरताड येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये गेले ३२ वर्षे ते प्राध्यापक पदी कार्यरत असून या महिन्याच्या अखेरीस ते निवृत्त होणार आहेत. पारा यांच्या प्रदर्शन पुस्तिकेत ज्येष्ठ चित्रकार आर. बी. भास्करन, दिग्गज कलासमीक्षक नियती शिंदे, मराठी कवी मंगेश नारायणराव काळे आदींनी आपली मत प्रकट केलेली आहेत. प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनीही मागील वेळी भरविण्यात आलेल्या पारा यांच्या प्रदर्शनात आपली मते प्रदर्शन पुस्तिकेत प्रकट केली होती.

Sachin Unhalekar

Sachin Unhalekar

About Author

सचिन उन्हाळेकर ( Sachin Unhalekar ) हे ज्येष्ठ पत्रकार असून 23 वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिका, शैक्षणिक - कला आणि मंत्रालय पत्रकारिता करत आहेत. त्यांनी मराठी, इंग्रजी सोबत हिंदी भाषेतील वृत्तपत्रात पत्रकारिता केलेली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव