मुंबई

संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे : रामदास आठवले

X : @therajkaran

मुंबई

महायुती मजबूत आहे. महायुतीमध्ये एकजूट आहे. संजय राऊत (Sanjay Raut) मात्र मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी बेछूट कपोलकल्पित आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरील संजय राऊत यांनी केलेले आरोप पूर्ण खोटे आणि चुकीचे आहेत, असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी (Ramdas Athawale) व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबाबत संजय राऊत यांनी उधळलेली मुक्ताफळे अत्यंत चुकीची असून खोटे आरोप केले आहेत. संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे असून निषेधार्ह आहे, असे ही ना. रामदास आठवले म्हणाले.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे चांगले, लोकप्रिय ज्येष्ठ नेते आहेत. ते चांगले काम करतात. त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न भाजप – रिपाइं महायुतीने (Mahayuti) केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना रसद पुरवली हा त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचा आणि मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपाचा आम्ही निषेध करतो, असे सांगून आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) आणि रिपब्लिकन पक्षासह सर्व महायुती नेत्यांनी महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) पराभूत करण्याचा एकजुटीने प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेला आरोप हा अत्यंत निषेधार्ह व खोटा आहे. अजितदादा यांच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केल्याचा संजय राऊत यांचा आरोप निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांचे आणि भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. महायुतीचे सर्व घटकपक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व महायुती (Mahayuti) नेत्यांनी एकजुटीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे चुकीचे आरोप करून संजय राऊत यांनी संभ्रम निर्माण करू नये, महायुती ही मजबूत आहे.

महायुतीमध्ये एकजूट आहे. संजय राऊत यांचे आरोप हे कारस्थानी आरोप आहेत. महायुतीमध्ये असा कोणतेही कपटकारस्थान होत नाही, सर्व महायुती मनापासून एकजूट आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election) महायुतीचे सर्व घटकपक्ष एकजुटीने लढले असून त्याचा परिणाम म्हणून महायुतीचा महाराष्ट्रात मोठा विजय होईल, असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव