महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे थकीत २४०० कोटी तातडीने द्यावेत – राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

पुणे : राज्यातील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आरटीई (शिक्षण हक्क कायदा) शुल्काच्या प्रतिपूर्तीचे थकीत २४०० कोटी रुपये तातडीने शाळा व्यवस्थापनांना देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवले आहे. […]