उद्योगांची दुहेरी कर जाचातून सुटका करावी – मार्केट सेस व व्यवसाय कर रद्द करावा : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी राज्य सरकार विविध धोरणे आखत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक येत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना दुहेरी कराचा बोजा सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामपंचायत आणि MIDC तर शहरी भागातील उद्योगांना नगरपालिका, महानगरपालिका आणि MIDC अशा दोन्ही यंत्रणांकडून […]