ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरील वक्तव्यावरून वाद; गिरीष महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ संदर्भात मंत्री गिरीष महाजन यांनी केलेले वक्तव्य देशाच्या सार्वभौमत्वाला आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला कमी लेखणारे असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती. देशाच्या […]



