महाराष्ट्र

‘गोकुळ’मध्ये बहुमत असूनही अध्यक्ष निवडीला अडथळा; सहकारातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह

२५ पैकी १३ संचालक निवडून येऊनही विरोधी गटाच्या अनुपस्थितीमुळे गणपूर्तीचा पेच; अध्यक्ष निवडीसाठी १० नोव्हेंबरला पुन्हा सभा घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई/कोल्हापूर  : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील महत्त्वाची संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या, म्हणजेच ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला संघर्ष आता केवळ दोन राजकीय गटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या संचालकांना तांत्रिक […]