“चल हल्ला बोल” ने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पटकावले पुरस्कार
मुंबई: पदमश्री नामदेव ढसाळ यांची कविता सिनेमात असल्याने सेन्सॉर बोर्डाने नाकारलेला “चल हल्ला बोल” हा चित्रपट दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये विजयी झाला आहे. या चित्रपटाने बॉलीवूड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकले. अंधेरी येथे बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मोठ्या दिमाखात भरले होते. फेस्टिवलचे आयोजक प्रतिभा शर्मा आणि यशपाल शर्मा होते. […]