विधान परिषदेत महाबळेश्वर आणि माथेरानमधील इको-सेन्सिटिव्ह जमिनींच्या चौकशीबाबत माहिती देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाबळेश्वर-माथेरानमधील इको-सेन्सिटिव्ह जमिनींची चौकशी; तीन महिन्यांत अहवाल, फ्रीहोल्ड निर्णय रद्द

मुंबई : महाबळेश्वर, माथेरान आणि इतर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको-सेन्सिटिव्ह) क्षेत्रांतील शासकीय जमिनींवरील कथित गैरव्यवहार, अटींचे उल्लंघन आणि अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधान परिषदेत ही माहिती दिली. बावनकुळे यांनी सांगितले की, कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणारी समिती तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करून पुढील अधिवेशनात अहवाल […]

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत मिशनरी संस्थांच्या जमिनींच्या राज्यव्यापी चौकशीची घोषणा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील मिशनरी जमिनींची तीन महिन्यांत चौकशी; महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : राज्यातील मिशनरी संस्थांच्या ताब्यातील जमिनींच्या मालकी हक्क आणि व्यवहारांची राज्यव्यापी पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत घोषणा करत, संपूर्ण चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नाशिकमधील मिशनरी संस्थांच्या नावावरील जमिनींच्या अभिलेखांची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत जमाबंदी आयुक्त […]