ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – मुख्य सचिव सुजाता सौनिक
ठाणे : जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्प वेळेत आणि गतीने पूर्ण व्हावेत, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करावे, असे निर्देश मुख्य सचिव तथा ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, नवी मुंबई महानगरपालिका […]