चार महिन्यांत 293 शेतकरी आत्महत्या; डिझेल टंचाई आणि रखडलेल्या पीककर्जामुळे मराठवाड्यात चिंता
खरीप हंगाम तोंडावर असताना इंधनटंचाई, कर्जमाफीतील विलंब आणि वाढते आर्थिक संकट शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे करत आहे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल 293 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. वाढते कर्ज, शेतीमालाला न मिळणारा पुरेसा भाव, डिझेल टंचाई आणि पीककर्ज वितरणातील अनिश्चितता यामुळे […]
