बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी नऊ जणांना अटक; दोघे फरार, विधानसभेत आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे फरार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या प्रकरणी आमदार नितीन अर्जुन […]
