डॉ. नीलम गोऱ्हे नंदुरबार POCSO प्रकरणाच्या व्यापक तपासाची मागणी करताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

नंदुरबार प्रकरणाचा तपास एका आरोपीपुरता मर्यादित ठेवू नका; संपूर्ण साखळीचा शोध घ्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पीडित अल्पवयीन मुलांची ओळख गोपनीय ठेवण्याची मागणी; बालस्नेही समुपदेशन, सायबर तपास आणि स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करण्याचे आवाहन पुणे: नंदुरबार जिल्ह्यात एका २२ वर्षीय युवकाच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्यामागे आणखी व्यक्ती, मध्यस्थ किंवा सूत्रधार […]