ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने मलिकार्जुन नदीला पूर; महाडच्या विन्हेरे विभागात १९ वर्षांनंतर पुन्हा पूरस्थिती
महाड : महाड तालुक्यातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील विन्हेरे विभागात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मलिकार्जुन नदीला अचानक पूर आला. नदीच्या पाण्याने विन्हेरे गावातील बागआळी परिसरात प्रवेश केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हणे देवाचा डोंगर परिसरात अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याचा मोठा लोंढा मलिकार्जुन नदीत आला. नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने बागआळी परिसरात पूरस्थिती […]
