महाराष्ट्र ताज्या बातम्या

ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने मलिकार्जुन नदीला पूर; महाडच्या विन्हेरे विभागात १९ वर्षांनंतर पुन्हा पूरस्थिती

महाड तालुक्यातील विन्हेरे विभागात ढगफुटीसदृश मुसळधार पावसानंतर मलिकार्जुन नदीला आलेल्या पुराचे दृश्य.

महाड : महाड तालुक्यातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील विन्हेरे विभागात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मलिकार्जुन नदीला अचानक पूर आला. नदीच्या पाण्याने विन्हेरे गावातील बागआळी परिसरात प्रवेश केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हणे देवाचा डोंगर परिसरात अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याचा मोठा लोंढा मलिकार्जुन नदीत आला. नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने बागआळी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी काही घरांच्या परिसरात शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली.

स्थानिक रहिवासी बंटी जंगम यांनी सांगितले की, सुमारे १९ वर्षांपूर्वीही ताम्हणे देवाचा डोंगर परिसरात अशाच प्रकारचा ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळीही मलिकार्जुन नदीला पूर येऊन बागआळी परिसरात पाणी शिरले होते. यंदाच्या पावसामुळे त्या घटनेची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. सध्या प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात