महाड तालुक्यातील विन्हेरे विभागात ढगफुटीसदृश मुसळधार पावसानंतर मलिकार्जुन नदीला आलेल्या पुराचे दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने मलिकार्जुन नदीला पूर; महाडच्या विन्हेरे विभागात १९ वर्षांनंतर पुन्हा पूरस्थिती

महाड : महाड तालुक्यातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील विन्हेरे विभागात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मलिकार्जुन नदीला अचानक पूर आला. नदीच्या पाण्याने विन्हेरे गावातील बागआळी परिसरात प्रवेश केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हणे देवाचा डोंगर परिसरात अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याचा मोठा लोंढा मलिकार्जुन नदीत आला. नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने बागआळी परिसरात पूरस्थिती […]

रायगड-रत्नागिरीला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत पुलाला भरकटलेल्या ड्रेजर आणि बार्जची धडक लागल्यानंतरचे दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आंबेत पुलाला ड्रेजरची धडक; रायगड-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद

मध्यरात्री भरतीच्या वेळी भरकटलेल्या तीन ड्रेजर आणि बार्जची पुलाच्या खांबाला धडक; नुकसानाचे चित्र ड्रेजर हटवल्यानंतर स्पष्ट होणार महाड: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील महत्त्वाच्या आंबेत पुलाला मध्यरात्री भरतीच्या वेळी भरकटलेल्या तीन ड्रेजर आणि वाळू वाहतूक करणाऱ्या बार्जची जोरदार धडक बसली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून रायगड-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]