रायगडावरील सिंहासन-राजसदर दहा दिवस अंधारात; ASIच्या देखभालीवर प्रश्न
13 सप्टेंबरपासून प्रकाशव्यवस्था बंद; तक्रारी करूनही दुरुस्तीला विलंब, आज सायंकाळपर्यंत पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या किल्ले रायगडावरील सिंहासन आणि राजसदर परिसराची प्रकाशव्यवस्था गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक रायगडावर येत असताना इतक्या महत्त्वाच्या परिसरातील प्रकाशव्यवस्था दीर्घकाळ बंद राहिल्याने भारतीय […]
