रायगड रोपवे पाचाडहून सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडावरील प्रस्तावित नव्या रोपवेसाठी पाचाडचा पर्याय; जिजामाता समाधीपासून मार्ग सुरू करण्याची मागणी

पाचाड ग्रामस्थ व शिवप्रेमींचे भरत गोगावले यांना निवेदन; ज्येष्ठ, महिला, दिव्यांग आणि पर्यटकांना सुविधा मिळण्याचा दावा महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी भविष्यात नवीन रोपवे उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन झाल्यास तो पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधी परिसरातून सुरू करावा, अशी मागणी पाचाड परिसरातील ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी केली आहे. या मागणीचे निवेदन स्थानिक आमदार तथा […]

रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सत्तासमतोलाचे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर रायगडचा ‘गड’ गोगावलेंकडे….; तर नाशिकची ‘कमान’ महाजनांकडे…..!

महायुतीतील पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; शिवसेनेचा रायगडवरील दावा कायम, भाजपने नाशिकची ‘राजकीय कमान’ राखली……. मुंबई — साधारण दीड वर्षांपासून प्रलंबित आणि वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या राजकारणात सुरू असलेल्या रस्सीखेचीला सोमवारी अखेर पूर्णविराम मिळाला. आता रायगडचा ‘गड’ शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे, तर नाशिकची महत्त्वाची राजकीय-प्रशासकीय सूत्रे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या हाती देत महायुती […]