नाशिक रिंगरोड प्रकरणाची चौकशी; ‘बळजबरीने भूसंपादन होणार नाही’ : महसूलमंत्री बावनकुळे
मुंबई : नाशिक रिंगरोड प्रकल्पाच्या अलाईनमेंटबाबत उपस्थित झालेल्या वादानंतर राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली असून, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतेही बळजबरीचे भूसंपादन केले जाणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. विधानसभेत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, रिंगरोडच्या अलाईनमेंटमध्ये बदल का करण्यात आला, याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच, गेल्या तीन वर्षांत या परिसरात झालेल्या जमीन खरेदी-विक्री […]

